नवीन उपक्रमाचा तपशील
चित्पावन ब्राह्मण मंडळ, औरंगाबादने मराठवाडा विभागातील चित्पावन ब्राह्मण बांधवांची समग्र माहिती कोशाची निर्मिती केलेली आहे.
सध्या कोरोना संकटामुळे प्रकाशन समारंभ मोठ्या प्रमाणावर करता येत नसल्याने, ह्या माहिती कोशाचे मुद्रक व प्रकाशक श्री आशिष गोखले (स्पैन पब्लिकेशन्स) यांच्या राहत्या घरी, मंडळाचे अध्यक्ष श्री. विकास गोंधळेकर व कार्यकारणीतील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत, रविवार, दिनांक 18/ 10/2020 (अश्विन शुद्ध द्वितिया शके 1942) रोजी सायंकाळी चार वाजता ग्रंथपूजन व प्रकाशन हा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी विशेष पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योगपती श्री. राम भोगले, सुप्रसिद्ध शल्य विशारद डॉ. आनंद देवधर, व एडवोकेट सौ. अर्चना गोंधळेकर हे उपस्थित होते.
सदरहू माहितीकोश पुस्तिका, मंडळाचे सचिव श्री सुभाष आपटे यांचे घरी सोमवार दिनांक 19/10/2020 पासून हा ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध असेल.
मा. निवडणूक अधिकारी चित्तपावन ब्राह्मण मंडळ औरंगाबाद यांनी दिनांक २८ -२ -२०२१ रोजी झालेल्या मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडणूक कार्यक्रम पत्रिका प्रमाणे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढीलप्रमाणे कार्य कारिणी चे निवडणूकी बाबत चा निकाल जाहीर केला आहे. सन २०२० - २०२५ साठी:
ही सभा आपण खाली बघू शकता: